विद्यार्थ्यांनी योग्य ध्येय समोर ठेऊन वाटचाल करावी ; माजी आमदार शंकर कांबळी 

वेंगुर्ला

     विद्यार्थ्यांनी योग्य ध्येय समोर ठेऊन वाटचाल करावी.कठोर परिश्रम घेत व संकटांवर मात करीत यशस्वी व्हावे. वेंगुर्ले तालुका शिवसेनेने केलेला विद्यार्थी गुणगौरव हा निश्चितच स्तुत्य उपक्रम आहे.यापुढेही शिवसेनेमार्फत विद्यार्थ्यांना लागणारी मदत व सहकार्य करण्यात येईल,असे प्रतिपादन माजी आमदार शंकर कांबळी यांनी वेंगुर्ले येथे केले.वेंगुर्ले तालुका शिवसेनेतर्फ वेंगुर्ले तालुक्यातील दहावी – बारावीतील ११६ गुणवंत विद्यार्थ्यांचा साई दरबार हॉल येथे माजी आमदार शंकर कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला, यावेळी शंकर कांबळी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब, आडेली माजी सरपंच प्रकाश गडेकर, उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे व बाळा दळवी, तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, शहरप्रमुख अजित राऊळ, महिला तालुका संघटिका सुकन्या नरसुले, महिला शहर संघटिका मंजुषा आरोलकर, माजी नगरसेवक तुषार सापळे, उपतालुकाप्रमुख उमेश नाईक, हिमांशु परब, शहर समन्वयक विवेकानंद आरोलकर, दाभोली सरपंच उदय गोवेकर, वायंगणी सरपंच सुमन कामत,ओबीसी सेलचे निलेश चमणकर, डेलिन डिसोजा, रवि नाईक, दिलीप राणे, हेमंत मलबारी, अभि मांजरेकर, संजय परब, समिर शेटकर,वेतोरे पालकरवाडी माजी सरपंच अर्जुन कानडे, देविदास वेंगुर्लेकर, मनोहर येरम, विलास राऊळ, सुभाष माळकर,आनंद दाभोलकर,समृद्धी कुडव, अनन्या धावडे, सिमा गावडे, कोमल सरमळकर, वैशाली वडर, विलास राऊळ आदींसह तालुक्यातील पदाधिकारी, शिवसैनिक, पालक उपस्थित होते. शैलेश परब, संजय पडते यांनीही मार्गदर्शन केले.प्रास्ताविकात शिवसेनेच्या माध्यमातून तालुक्यात सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत,असे यशवंत परब यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत परब व आभार आनंद दाभोलकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page