वेंगुर्ला /-

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज वेंगुर्ला पंचायत समितीचे उपसभापती व जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री सिद्धेश उर्फ भाई परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आले. आज दिं 26/जुलै/2022 रोजी ओरोस येथे जिल्हा काँग्रेस ची मीटिंग प्रभारी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्री इर्शाद शेख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली . माजी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्री बाळा गावडे यांनी आपला राजीनामा दिल्यानंतर आणि पक्ष सोडल्या नंतर ही पहिली काँग्रेस ची मीटिंग घेण्यात आली, येणाऱ्या नगर परिषद , जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकी विषयी चर्चा करण्यात आली.या वेळी जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष श्री विलास गावडे , माजी जिल्हा अध्यक्ष श्री विकासभाई सावंत,साईनाथ चव्हाण ,दिलीप नार्वेकर, जिल्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page