मुंबई /-
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरावरील सर्व विभाग आणि सेलच्या कार्यकारिणी तडकाफडकी बरखास्त करण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आगामी महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने हा बरखास्तीचा निर्णय घेताना महाराष्ट्रातील सर्व विभाग आणि सेलच्या कार्यकारिणी कायम ठेवल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव प्रफुल्ल पटेल यांनी एक पत्र सगळ्या सेलच्या प्रमुखांना दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी प्रफुल्ल पटेल यांची सही असलेल्या या पत्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या सेलच्या आणि विभागाच्या कार्यकारिणी बरखास्त केल्याचे म्हटले आहे.
