वेंगुर्ला /-


वेंगुर्ले शहरातील साई मंगल कार्यालय समोरील कापड दुकानास सोमवारी रात्री आकस्मिक आग लागून मोठे नुकसान झाले होते. संबंधित नुकसानग्रस्त अलमास मुजावर यांना आमदार दिपक केसरकर यांनी २५ हजार रुपये त्वरित आर्थिक मदत दिली आहे. मोठे नुकसान झाल्याने त्यांना
त्वरित आर्थिक मदत मिळावी यासाठी सचिन वालावलकर यांनी त्वरित पाठपुरावा केला. सदर मदतीचा चेक आज वेंगुर्ले निवडणूक नायब तहसिलदार संदिप पाणमंद यांनी नुकसानग्रस्तांना दिला.यावेळी 
मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, माजी नगरसेविका सुमन निकम, वेंगुर्ले शहर तलाठी गवते, सामाजिक कार्यकर्ते सचिन वालावलकर
आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page