कुडाळ /-


सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव दिनांक १३ जुलै रोजी कुडाळ येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात दुपारी ३.३० वाजता साजरा होणार आहे.
यानिमित्त धर्मनिष्ठ समाजनिर्मिती आणि हिंदू राष्ट्र स्थापना यावर व्याख्यान होणार असून समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्याशी संबंधित मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच लघुपट, स्वसंरक्षण प्रात्यक्षिके, धर्म प्रेमी, हितचिंतकांचा सत्कार आदींचे सत्कार होणार आहेत. हिंदु धर्मातील अद्वितीय अशी श्रेष्ठ परंपरा म्हणजे गुरु-शिष्य परंपरा. राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना सुव्यवस्था निर्माण करण्याचे महत्कार्य गुरु-शिष्यांनी केल्याचा गौरवशाली इतिहास भारताला लाभला आहे. त्या काळी अधर्म माजला असतांना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाकडून, आर्य चाणक्यांनी सम्राट चंद्रगुप्ताच्या आणि शिवछत्रपतींनी संत तुकाराम महाराज अन् समर्थ रामदासस्वामी यांच्या कृपेने आदर्श असे धर्माधिष्ठित राज्य स्थापन केले. आजही राष्ट्र आणि धर्म यांची दुःस्थिती झाली आहे. यावर एकमेव उपाय म्हणजे हिंदु राष्ट्र स्थापन करणे हा होय. हिंदु राष्ट्र अर्थात धर्मनिष्ठ समाज निर्मितीसाठी प्रयत्न करणे, ही काळानुसार सर्वोत्तम गुरुसेवाच आहे. अशा गुरू शिष्य परंपरेचे महत्व सांगणार्या या गुरूपौर्णिमा उत्सवास सर्वानी उपस्थित राहावे, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page