वेंगुर्ला / –
वेंगुर्ले तालुका शिवसेनेची मासिक सभा मंगळवार दि. १२ जुलै रोजी सकाळी ११ वा. शिवसेना तालुका मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.यावेळी आगामी होणाऱ्या जि.प.,पं. स., न.प. निवडणुकांच्या अनुषंगाने तसेच विकास कामांच्या दृष्टीने चर्चा करण्यात येणार आहे.यावेळी उपजिल्हाप्रमुख, शहरप्रमुख, माजी जि.प.सदस्य,माजी पं. स.सदस्य,उपतालुकाप्रमुख,माजी नगरसेवक,महिला पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच,अन्य पदाधिकारी यांनी वेळीच उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी केले आहे.