कणकवली /-

कणकवली शहर मर्यादित समाजविघातक नेत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरणाबाबत दरोडेखोर लुटारू असे आरोप केले. आरोप करणाऱ्या पुर्वईतिहास मला माहित आहे. पारकर यांनी कर्ज न फेडता कणकवली शहरातील अनेक पतसंस्थात दरोडे घातलेत. मिलिंद कोदे या व्यापाऱ्याला उधारी मगितल्यावरून भर बाजारपेठेत पट्ट्याने मारहाण केली.

तत्कालीन पोलीस निरीक्षक साळुंखे यांना मारहाण करणारे गुंड प्रवृत्तीचे संदेश पारकर असल्याची टीका नगराध्यक्ष समीर नलावडें यांनी नाव न घेता केली.52 पत्त्यांमधील जोकरला मी किंमत देत नाही. पारकर यांची विधाने म्हणजे बालिश बहु बायकांत बडबडला अशी अवस्था असल्याचा टोला नलावडे यांनी लगावला. कणकवली नगरपंचायत प्रशासनाने विधिवत पूजा करून शिवाजी महाराजांचा पुतळा सुरक्षितपणे नगरपंचायत सभागृहात ठेवलेला आहे. पहाटे ब्रम्हमुहूर्तावर छञपतींचा पुतळा सुरक्षित आणून ठेवलेला आहे अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडें यांनी दिली. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, बांधकाम सभापती ऍड. विराज भोसले, आरोग्य सभापती तथा गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अभि मुसळे, महेश सावंत, राजू गवाणकर आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना नलावडे यांनी जुगार, अवैध धंदे, काही नाजूक विषयात कोण पुढे असतं हे जनतेला माहीत आहे असे सांगत नगराध्यक्ष नलावडे यांनी पारकर यांची कुंडलीच बाहेर काढली. कणकवली शहराचा नियोजनबद्ध विकास काय असतो हे आम्ही दाखवून दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांचे दैवत होते.

बाळासाहेबांच्या शिवसेनेतील कणकवली शहर मर्यादित पारकर यांनाच बाळासाहेबांच्याच हिंदुत्वाला विरोध असल्याचे यातून स्पष्ट होते. शिंदे गटाने बंद करण्याआधी सकाळी पारकर यांनी उद्धव ठाकरेंच्या हातात हात देत हस्तांदोलन केले आणि संध्याकाळी ठाकरे सरकार गडगडले. अपशकुनी पारकरांच्या विरोधात कणकवलीकरांनी मला नगराध्यक्षपदी निवडून दिले आहे. मुख्यमंत्री, पालकमंत्री, तुमचा असताना मागील अडीच वर्षे छत्रपतींचा पुतळा स्थलांतर करू शकला नाहीत, ते आम्ही अवघ्या 3 दिवसांत कणकवली नगरपंचायत प्रशासनाने करून दाखवले. पुतळा स्थलांतर बाबत हायकोर्टात जा किंवा आणखी कुठे जा. पुतळा स्थलांतरण बाबत प्रशासनाकडे साधा अर्ज केला तरी सगळी माहिती मिळेल असेही नलावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page