कुडाळ /-

“आषाढी एकादशी” म्हटल कि असंख्य वारकरी आपल्या विठ्ठलाचा नामघोष करित श्री पांडुरंगाच्या दर्शनाला पायी पंढरीला जायला निघतात. संपुर्ण वारी विठ्ठलमय होऊन जाते.
“ठायी ठायी विठ्ठल! ठायी ठायी पंढरी”
या पंक्ती प्रमाणे. कोकण कुडाळ तालुक्यातील चित्रकार अल्पेश घारे यांनी आषाढी एकादशीचा अवचित्य साधून श्री पांडूरंगाचे सुमुख दर्शन देणारी ४० फुट एवढी मोठी रांगोळी
म्हापन – वेंगुर्ला येथील कातळ – दगडावर साकारली आहे. हि रांगोळी साकारायला त्याला तीन तासाचा अवधी लागला.
हि रांगोळी/कलाकृती वारकरी व पंढरीच्या वारीला समर्पित करीत आहे असे अल्पेश म्हणतो. पांडुरंगा बाबतची
अस्सिम भक्ती या ४० फुट रांगोळीच्या माध्यमातूण व्यक्त केली आहे असेही अल्पेश म्हणतो.
कोकणात पाऊस भरपुर, परंतु हि रांगोळी साकारुन पुर्ण होईपर्यंत त्या तीन तासात पावसाचा एकही थेंब आला नाही. हे केवळ त्या पांडूरंगाच्या कृपादृष्टीने झाले असावे.
असे सुंदर,मनमोहक विठ्ठलाचे सुमुख दर्शविणाऱ्या रांगोळीची एक छोटी चित्रफित मी प्रदर्शित करीत आहे. असेही अल्पेश म्हणाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page