कुडाळ /-

मागासवर्गीय एज्युकेशन सोसायटी मांडकुली केरवडे पंचक्रोशीच्या प.पूज्य आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली – केरवडे मध्ये संगीत वर्ग सुरू झाले. शिक्षण क्षेत्रात संगीत विषयाचे वाढते महत्व लक्षात घेऊन संस्था व श्री देव जगन्नाथ संगीत विद्यालय केरवडे यांच्या संयुक्त विद्यमाने हा वर्ग सुरू करण्यात आला. या वर्गाचे उदघाटन पांग्रड विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक मंगेश मराठे यांच्याहस्थे व संस्था अध्यक्ष परशुराम नार्वेकर, माजी विद्यार्थी व संगीत विदयालयाचे संदीप केरवडेकर संस्था उपाध्यक्ष कृष्णा भोई, संस्था संचालक, मुख्याध्यापक सुरेंद्र खोत, शिक्षक वर्ग, पालक ग्रामस्थ, उपस्थित होते.

या वर्गाला डॉ. दादा परब, धनंजय सावंत हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या वर्गाला मुंबई येथील सुप्रसिद्ध गायक प्रदीप धोंड व प्रशांत धोंड यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे. या वर्गाच्या उदघाटन प्रसंगी मंगेश मराठे व संदीप केरवडेकर यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनसाठी संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या नवनवीन उपक्रमांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी संस्था अध्यक्ष परशुराम नार्वेकर यांनी या संगीत मार्गदर्शन वर्ग आयोजनाचा उद्देश स्पष्ट करत या वर्गाचा जास्तीत विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे सांगत विद्यार्थी हीत लक्षात घेऊन भविष्यात संस्थेकडून विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सूतोवाच्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेंद्र खोत यांनी तर सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक अनिल गोवेकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page