देवगड /-
तारामुंबरी येथील स्नेहा तारकर या 70 वर्षीय वृद्ध महिलेच्या राहत्या घराची भिंत अतिवृष्टीमुळे कोसळून 50 हजारांचे नुकसान झाले. देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी तात्काळ स्नेहा तारकर याना देवगड पोलिसांच्या वतीने गृहपयोगी वस्तू देऊन सामाजिक बांधिलकी जपली. स्नेहा तारकर या 70 वर्षीय वयोवृद्ध एकट्याच घरात राहतात. दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीचा फटका बसून तारकर यांच्या राहत्या घराची भिंत आज कोसळली. सुदैवाने तारकर आजी याना कोणतेही दुखापत झाली नसली तरी दैनंदिन गरजेच्या वस्तू मात्र कोसळलेल्या भिंतीखाली नाहीशा झाल्या. देवगड पोलीस निरीक्षक बगळे यांना ही घटना समजताच तातडीने पीआय बगळे यांनी स्वतः तारामुंबरी येथे जात स्नेहा तारकर याना गृहोपयोगी वस्तू घरपोच केल्या. शासकीय मदत मिळेल तेव्हा मिळेल, परंतु देवगड पोलिसांनी तात्काळ केलेल्या मदतीने तारकर आजीचे डोळे मात्र पाणावले होते.
