ओरोस /-
ओरोस येथे सुरू असलेल्या 58, महाराष्ट्र, बटालियन, एन.सी.सी ओरोसच्या अंतर्गत सुरू असलेल्या दहा दिवसीय शिबिरामध्ये इंटर बटालियन ड्रिल स्पर्धा ५८, महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. ओरोसचे कामाडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाळ (एस. एम.) यांच्या नेतृत्व अंतर्गत संपन्न झाले. थलसेना ( TSC) व वार्षिक ट्रेनिग कॅम्प (ATC) कॅम्पचे आयोजन दि. ०१ जुलै ते १० जुलै २०२२ या कालावधीत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ओरोस येथे आयोजित केले आहे. या ड्रिल स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, कराड, सातारा, सांगली येथिल बटालियन मधील १०४ कॅडेट्स सहभागी झाले होते. या कॅम्पमधील ड्रिल स्पर्धामध्ये सुभेदार देवेद्रकुमार, सुभेदार तुकाराम खैरनार, सुभेदार इंद्रकेश, सुभेदार तिवारी सर्व PI स्टाफ सहभागी होते. या ड्रिल स्पर्धेत एन सी सी अधिकारी लेफ्टनंट एस. एल. भट्टर, लेफ्टनंट बी. एल. राठोड, चीफ ऑफिसर एस.डी. कांबळे, फर्स्ट ऑफिसर रामदास कापसे हे परीक्षक होते. ही ड्रिल स्पर्धा कामाडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाळ ( एस. एम. ) यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
