सावंतवाडी /-
काल सोमवारपासून पडलेल्या आज सकाळपासून पुन्हा जोर धरला आहे. या मुसळधार पावसामुळे तळवडे बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले आहे. तळवडे बाजारपेठेचे होणारे विस्तारीकरण तसेच बाजारपेठेत वाढते बांधकाम याचा फटका पूर्णपणे बसला आहे. बाजारपेठेतून पाणी जाण्याचा मार्ग बंद काही ठिकाणी बंद झाल्याने पाऊस पडल्यावर लगेच पाणी बाजारपेठेत घुसत आहे.यावर प्रशासनाने तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरीकांमधून होत आहे.
