कुडाळ /-

महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागामार्फत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाचे वरिष्ठ संशोधक डॉ संतोष हरम यांचे व्याख्यान थिंक बिग विथ स्मॉल थिंग्स -नॅनोटेक्नॉलॉजी फॉर एनर्जी अँप्लिकेशन्स या विषयावर 20 जून 2022 रोजी सकाळी 11 . 00 वाजता संपन्न झाले . भविष्यात उर्जेच्या स्त्रोतांसाठी नॅनोटेक्नॉलॉजीचा वापर करून मानवी जीवनाचा शाश्वत विकास कसा करता येईल याबद्द्ल डॉ संतोष हरम यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानातून विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . यावेळी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ व्ही. बी. झोडगे यांनी नॅनोटेक्नॉलॉजी ही काळाची गरज असून विध्यार्थ्यांनी या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा पीटर रॉड्रीग्ज यांनी केले , प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा अजित कानशिडे यांनी करून दिली तर आभारप्रदर्शन प्रा प्रमोद जमदाडे यांनी केले यावेळी प्रा एस. जी. पाटील, श्याम दाभोळकर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page