मुंबई /-

मागील नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षात आता राज्यपालांची एंट्री झाली आहे.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गुरूवारी बहूमत चाचणी सिध्द करण्याचे आदेश दिले आहे.त्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासह गुवाहाटीत असलेले सर्व 49 आमदार गुरूवारीच मुंबईत येणार आहेत. त्याआधी या सर्व आमदारांना बुधवारी गोव्यात पोहचले आहेत.

शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांचा गट उद्या गुरुवारी ३० जून रोजी मुंबईत येणार आहेत.ही माहिती स्वत: एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.गुवाहाटीत कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांना माहिती दिली.पण आजच ते गोव्याकडे रवाना होणार आहेत.सुरूवातीला सूरत आणि नंतर गुवाहाटी गाठलेले हे आमदार आता गोव्यात जाणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.

एकनाथ शिंदे व तीन-चार आमदार वगळून इतर सर्व आमदार गुवाहाटीतून निघण्यापूर्वी कामाख्या मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत. तिथून ते थेट विमानतळावर जातील. त्यासाठी दोन बसेसची व्यवस्था करण्यात आलीआहे.विमानतळावरून या आमदारांना गोव्याला नेले जाणार आहे.

गोव्यात त्यांच्यासाठी ताज रिसॉर्ट 70 खोल्या बुक करण्यात आल्याचे समजते. त्यानंतर हे आमदार गुरूवारी सकाळी गोव्यातून मुंबईत दाखल होतील, असं सांगितलं जात आहे. बंडखोर आमदारांविरोधात सुरू असलेल्या शिवसैनिकांच्या आंदोलनामुळे ही दक्षता घेण्यात आल्याचे समजते.

दरम्यान,राज्यातील सत्ता संघर्षाचा पेच शिगेला पोहचला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधाभवन सचिवालय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्यासाठीचे आदेश देणारं पत्र पाठवले.यानंतर गुरुवारी ३० जून रोजी उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या या पत्रानंतर 30 जूनला बहुमत चाचणी करण्यात येणार आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला ३० जून बहुमत चाचणी सिद्ध करण्यासाठी तातडीने अधिवेशन बोलण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कोणत्याही कारणास्तव अधिवेशन तहकुब करता येणार नाही. गुप्त पद्धतीने मतगान होणार नाही, शिरगणती करुन बहुमत चाचणी होईल.उद्या सकाळी ११ वाजता अधिवेश सुरु होईल, बहुमत चाचणी प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page