मुंबई/-

आपला गट अन्य कुठल्या पक्षात विलीन करण्याशिवाय एकनाथ शिंदे यांच्याकडे दुसरा पर्याय नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या फोनवरुन चर्चा झाल्याचीही कुजबूज ऐकायला मिळतेय. विशेष म्हणजे आता एकनाथ शिंदे यांचा गट राज ठाकरेंच्या मनसेमधये प्रवेश करु शकतो, अशी शक्यता वर्तवली जातेय. तसे प्रयत्नही पडद्याआड सुरु असल्याचं बोललं जातंय.

मुंबई : शिवसेनेत बंडखोरी करून वेगळा गट बनविणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यापुढे कायदेशीर पेच निर्माण झाले आहेत.दोन तृतीयांश आमदारांचा गट जरी त्यांच्यासोबत असला, तरी त्या गटाला अन्य कुठल्या तरी पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे बंडखोरांचा गट राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेवेत प्रवेश करू शकेल. त्यादृष्टीने पडद्याआड जोरात हालचाली सुरू आहेत.

दोन दिवसांपूर्वी भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची बडोदा येथे रात्री उशिरा बैठक झाली. त्या बैठकीत यावर चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी कायदेशीर लढाई लढायची असल्यास त्यात वेळ निघून जाईल आणि तेवढा धीर आमदारांमध्ये नाही. त्यांना त्यांच्या मतदारसंघात नकारात्मक वातावरण तयार होण्याआधीच या प्रश्नावर तोडगा हवा आहे.

कायदेतज्ज्ञांच्या मते…

➖दोन तृतीयांश आमदारांनी एकत्र येऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तरच त्यांची आमदारकी कायम राहते. त्यामुळे आता बंडखोर आमदारांचा गट मनसेमध्ये प्रवेश करेल.जेणेकरून त्यांची आमदारकी कायम राहील.

➖शिवाय राज ठाकरे त्यांच्या पक्षात बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरतात. त्यांचे नाव वापरतात. राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा नारा बुलंद केलेला आहेच. त्यामुळे हे सगळे फायद्याचे ठरेल, असे एकनाथ शिंदे यांना पटवून देण्यात आल्याचे समजते.

‘दुश्मन का दुश्मन, अपना दोस्त’

उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना देखील लगेच भावी नेता म्हणून पुढे आणण्याचे काम सुरू केले. त्यामुळे शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांना आपल्या भवितव्याचे काय? असा प्रश्न पडला. राज ठाकरे यांच्याबाबतीत असे नाही. त्यांनी कधीही स्वतःला मुख्यमंत्री व्हायचे आहे, असे सांगितलेले नाही. माझ्या पक्षाच्या हातात सत्ता द्या. मी बदल करून दाखवतो, असे ते कायम म्हणत आले आहेत. शिवाय त्यांचा मुलगाही अजून नव्याने राजकारणात उभा राहू पाहत आहे. या सगळ्या परिस्थितीचा विचार करूनच मनसेसोबत जाण्याला शिवसेनेतील बंडखोर गटानेही मान्यता दिल्याचे समजते.

उद्धव ठाकरे गेले तरी राज ठाकरे सोबत राहतील. एक ठाकरे आपल्यासोबत आहेत, शिवाय हिंदुत्वही आहे. यासारखी चांगली परिस्थिती दुसरी असू शकणार नाही. आपण भाजपमध्ये प्रवेश करत नाही, मात्र हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरेंसोबत गेलो असे म्हणायला बंडखोरांचा गट मोकळा होईल. राज ठाकरे यांनाही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात स्वतःची स्पेस तयार करायची आहे. बंडखोरांचे मुख्य शत्रू देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष आहेत. त्यामुळे ‘दुश्मन का दुश्मन, अपना दोस्त’ अशी नीती असल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीत यावरच चर्चा?

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या बडोद्यात बैठक झाल्याची माहिती समोर आली होती. या बैठकीत शिंदे गट मनसेत प्रवेश करु शकतो का, या दृष्टीने चर्चा झालेली असू शकते, असं तर्क लढवला जातोय. कायदेशीर लढाईत वेळ लागू शकतो. ही बाब लक्षात घेऊन बंडखोर आमदार मनसेत प्रवेश करुन भाजपसोबत सत्ता स्थापनेचा दावा करु शकतात, असाही एक पर्याय उपलब्ध असल्याची माहिती जाणकारांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर दोन महत्त्वाच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत.

शिंदे गट मनसेसोबत जाण्याच्या 2 शक्यता

सेनेतील ज्येष्ठ नेत्यांसमोर भवितव्याचा प्रश्न :- 

आदित्य ठाकरे यांना शिवसेनेचा भावी नेता म्हणून प्रोजेक्ट केलं जातंय. त्यात आपलं काय होणार, अशी शंका शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना सतावू लागली होती, अशी चर्चा आहे. राज ठाकरेंच्या बाबतीत सध्या तरी तसं नाही. सत्ता द्या, मी बदल घढजवून दाखवतो, अशी भूमिका राज ठाकरेंनी आपल्या सभेतून बोलून दाखवलेली होती. भाजपमध्ये जाण्याऐवजी मनसेत प्रवेश करुन भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली जास्त संयुक्तिक असू शकतात, असाही एक पर्याय असल्याचं बोललं जातं. शत्रूचा शत्रू, मित्र या म्हणीनुसार एकनाथ शिंदे गड मनसेत गेला तर आश्चर्य वाटायला नको.

ठाकरेही सोबत आणि हिंदुत्वही :-

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरही हिंदुत्व आणि ठाकरेंवरील श्रद्धा ही बंडखोरांना सोडता येणार नाही. त्यासाठी राज ठाकरेंसोबत गेल्यात दोन गोष्टी एकाच वेळी बंडखोरांना साधता येणार आहेत. एक म्हणजे हिंदुत्व आणि दुसरं म्हणजे ठाकरे हे नाव! हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरेंसोबत आम्ही गेलो, असा युक्तिवादही शिंदे गट करु शकतो. एककीडे काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात स्पर्धा करण्यासाठी यापुढे शिवसेनेत मर्यादा येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर थेट भाजप प्रवेश करण्याऐवजी मनसे हा त्यातल्या त्यात सुरक्षित पर्यात असू शकतो का, याचीही चाचपणी गेली जाण्याची शक्यताय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page