You are currently viewing पुणे रेल्वे स्थानकात तीन जिलेटीन कांड्या आढळल्याने खळबळ…

पुणे रेल्वे स्थानकात तीन जिलेटीन कांड्या आढळल्याने खळबळ…

पुणे /-

पुणे रेल्वे स्थानकावर तीन जिलेटीनच्या कांड्या आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. यामुळे पुणे रेल्वे स्थानकामधील प्लॅटफॉर्म 1 आणि 2 पूर्णपणे रिकामे करण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पुणे रेल्वे स्थानकावरील वाहतूक देखील काहीकाळासाठी थांबवण्यात आली आहे. तसेच रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारा जवळ मोठ्या प्रमाणात बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत.

फ्लॉटफोर्म क्र्मांक १ वर पोलिसांना या जिलेटीन कांड्या आढळल्या. यानंतर बॉंम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आले असुन आता या कांड्या तेथुन जवळच्या मोकळ्या मैदानात नेण्यात आल्या आहे. दरम्यान पुणे रेल्वे स्थानकावर वरिष्ठ पोलीअस अधिकारी तसेच श्वान पथक झाले असुन ते रेल्वेस्थानकच्या झाडाझडतीघेत आहे.तसेच पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

अभिप्राय द्या..