You are currently viewing उपरकर शूटिंग अकॅडमीच्या वतीने पाच दिवशीय नेमबाजी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन…

उपरकर शूटिंग अकॅडमीच्या वतीने पाच दिवशीय नेमबाजी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन…

सावंतवाडी /-

सावंतवाडी येथील उपरकर शूटिंग अकॅडमीच्या वतीने सावंतवाडी व वेंगुर्ला येथे ५ दिवसांचे नेमबाजी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सावंतवाडी, माठेवाडा येथील शूटिंग अकॅडमीमध्ये १७ मे ते २१ मे या दरम्यान, तर वेंगुर्ला कॅम्प येथील अकॅडमीमध्ये २२ मे ते २६ मे ला नेमबाजीचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबिरात १० वर्ष वरील मुले-मुली सहभागी होऊ शकतात. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे. नाव नोंदणी साठी ९४२११४५११६ / ९५२७४१७६८० या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

अभिप्राय द्या..