You are currently viewing गणेश मित्र मंडळ कुडाळच्या भव्य शूटींग-बाॅल स्पर्धेचे विशाल परब यांच्या हस्ते उद्घाटन..

गणेश मित्र मंडळ कुडाळच्या भव्य शूटींग-बाॅल स्पर्धेचे विशाल परब यांच्या हस्ते उद्घाटन..

माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडू घडलेले बघायचेत,त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार.;विशाल परब.

कुडाळ/-

गणेश मित्र मंडळ कुडाळ आयोजित आणि हिंदू मराठा संघाचे अध्यक्ष तथा युवा उद्योजक विशाल परब पुरस्कृत सिंधुदुर्ग जिल्हा भव्य खुल्या भव्य शूटिंग बॉल स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक तथा हिंद मराठा संघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते झाले.कुडाळ येथील मराठा हॉलच्या बाजूला असलेल्या मराठा समाजाच्या मैदानात हे उद्घाटन मोठ्या दिमाखात झाले.

यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी व उद्घाटक म्हणून हिंदू मराठा संघाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तथा युवा उद्योजक विशाल परब उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासोबत दादा साहिल, राजीव कुडाळकर, एकनाथ केसरकर,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अविनाश पराडकर,आनंद परब,दादा केसरकर,योगेश गावडे या सर्व मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गुणवंत खेळाडू निर्माण झाले पाहिजेत. यासाठी आपण वाटेल ती मदत करायला तयार आहे. तुम्ही खेळावर लक्ष केंद्रित करा. आर्थिक मदतीची तुम्ही अजिबात चिंता करू नका. त्यासाठी विशाल परब खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा आहे. अशी भावनिक हाक देत खेळाडू व मंडळांना आर्थिक मदत देण्याचे आश्वासन विशाल परब यांनी दिले. मी माणगाव हायस्कूल मध्ये असताना तुमच्यासारखाच विविध खेळामध्ये हुशार होतो. एकनाथ केसरकर सरांनी मला खेळा मध्ये घडवले.त्यामुळे केसरकर सरांचे हे उपकार मी खेळाच्या बाबतीत तरी विसरू शकत नाही. एकनाथ केसरकर सरांनी अशी गुणवंत खेळाडू घडवले. त्यामुळेच आज त्यांचे हुशार विद्यार्थी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह विविध भागात व देशभरात विविध क्षेत्रात पाहायला मिळतात. तुमची गुणवत्ता सिद्ध करा.ज्या क्षेत्रात तुम्ही खेळता त्या क्षेत्रात तुम्ही तुमचं नाव नंबर बनवलं पाहिजे. आयपीएल मध्ये जसा सावंतवाडीचा खेळाडू खेळताना पाहायला मिळाला. तसाच खेळाडू कबड्डी मध्ये पाहायला मिळाले पाहिजेत. यासाठी आतापासूनच तयारीला लागा. पैशाची चिंता करू नका. त्यासाठी आम्ही आहोत. आर्थिक पाठबळ मिळवून देणे ही आमची जबाबदारी आहे. मला माझ्या भागातील खेळाडू घडलेले बघायचे आहेत. त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे.पण तुम्हाला मैदान व व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी यापुढे विशाल परब यांची राहील. असे भावनिक आवाहन विशाल परब यांनी खेळाडूंना केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा