You are currently viewing कणकवली शहरात ५ एप्रिल रोजी जीवन आनंद संस्था – काढणार जनजागृती फेरी

कणकवली शहरात ५ एप्रिल रोजी जीवन आनंद संस्था – काढणार जनजागृती फेरी

कणकवली /

कणकवली परिसरातील निराधार व्यक्तींच्या पुनर्वसनाचे कार्य पणदूर येथील संदीप परब यांच्या जीवन आनंद संस्थेमार्फत होत आहे. तरीही निराधार, मतिमंद आणि ज्येष्ठ दुर्लक्षित यांची संख्या कमी होताना दिसत नाही. अशा व्यक्तींना माणूस म्हणून जगण्यासाठी काय करता येईल? या उद्देशाने कणकवलीचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या संकल्पनेतून एक जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. ही फेरी कणकवली शहरात मंगळवार दिनांक 5 एप्रिल 2022 रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आप्पासाहेब पटवर्धन चौक आणि पुढे बाजारपेठ मार्गे झेंडा चौक ते पटकी देवी मंदिर पर्यंत निघणार आहे. कणकवली शहरातील सामाजिक कार्य करणाऱ्या बहुतांश संस्थांचे सभासद या फेरीत सामील होणार असून सर्वसामान्य नागरिकांनीही आपली हजेरी या फेरीत लावावी असे आवाहन आम्ही कणकवलीकर, संदीप परब आणि पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..