कुडाळ /

वैश्यवाणी समाज सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष श्री सुनील भोगटे यांच्या अध्यक्षतेखाली आज कुडाळ येथे ,वैश्यवाणी समाज चा वधू -वर मेळावा घेण्या संदर्भातील महत्वाची बैठक आज १ एप्रिल रोजी कुडाळ हिंदू कॉलनी येथील वैश्यवाणी समाज कुडाळच्या कै.सौ.स्नेहलता गोविंदसेठ शिरसाट सभागृहात घेण्यात आली.या बैठकीत जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी वैश्यवाणी मेळावा समाजाचा वधूवर सूचक मेळावा १ मे २०२२ रोजी घेण्याचे सर्वांच्या एकमताने ठरविण्यात आले.आणि या संदर्भातील नियोजन करण्यात आले.

यावेळी वैश्यवाणी समाज सिंधुदुर्गचे अध्यक्ष- श्री सुनील भोगटे,सेक्रेटरी- श्री भार्गव धुरी,श्री.अरविंद शिरसाट,वैश्यवाणी समाज गुरू सेवा कमिटी अध्यक्ष- दीपक अंधारी (कणकवली),वैश्यवाणी समाज सावंतवाडी अध्यक्ष- श्री रमेश बोंद्रे,कमिटी मेंबर- श्री बाळ बोर्डेकर ,वैश्यवाणी समाज कुडाळ तालुका अध्यक्ष- सौ अस्मिता बांदेकर,कार्यवाह सौ सुचित्रा भोगटे, कमिटी मेंबर- सौ रुपाली शिरसाट ,श्री विजय भोगटे ,श्री उल्ल्हास शिरसाट , श्री सुनील धुरी , श्री जीवन बांदेकर यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page