You are currently viewing साळगांव येथे उद्या हिंदू राष्ट्र जागृती सभा..

साळगांव येथे उद्या हिंदू राष्ट्र जागृती सभा..


कुडाळ /-


.हिंदूंना संघटित करून धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कृतीप्रवण करण्याच्या हेतूने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने साळगांव येथे हिंदू राष्ट्र जागृती सभेचे आयोजन गुरूवार दि.31 मार्च रोजी करण्यात आले आहे. साळगांव येथील श्रीपायरोबा मंदिर येथे सायं.4 वा. या हिंदु राष्ट्र जागृती सभेचे आयोजन केले आहे. हिंदूना धर्म शिक्षण देऊन त्यांच्या मध्ये धर्माभिमान जागृत करणे आणि हिंदूसंघटन करणे आवश्यक आहे. यासाठीही या हिंदु राष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदुराष्ट्राची आवश्यकता या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी हिंदूं बांधवांनी या हिंदू राष्ट्र जागृती सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन समितीने केले आहे.

अभिप्राय द्या..