मुंबई /-

कोकणकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. कोकणाच्या विकासासाठी प्रस्थापित केलेल्या रायगड जिल्ह्यातील रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डीपर्यंतचा सागरी महामार्गाला अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे याचवर्षी महामार्गास मान्यता देऊन रस्ताच्या कामासाठी विकास महामंडळाकडे सोपविण्यात आला आहे. 498 किमीच्या या महामार्गाच्या बांधकामासाठी 10 हजार कोटींचा खर्च प्रस्थापित आहे. अंतिम 16 मार्च रोजी मान्यता मिळाली असून तो चार पॅकेजमध्ये टप्प्यात बांधण्यात येणार आहे.

कोकणच्या शेतकऱ्यासाठी सोन्याचे दिवस!

विशेष म्हणजे हा महामार्ग समुद्र किनाऱ्याजवळून जाणार आहे. यामुळे याचा फायदा येथील पर्यटनास नक्कीच होणार. या महामार्गामुळे कोकणाचा अधिक विकास देखील होणार असल्याचे बोलले जात आहे. कोकणातील प्रसिध्द आंबे, काजू, नारळ, सुपारी यांना आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळणार आहे. यामुळेच हा होणारा महामार्ग कोकणवायींसाठी फक्त महामार्ग नसून सोन्याचा रस्ताच आहे, असे म्हणता येईल. विशेष म्हणजे रेवस ते रेड्डी मार्गावरील केळसी खाडीवरील पुलासाठी 148 कोटी जवळपास खर्च मंजूर करण्यात आला आहे.

सागरी महामार्गाचा मुंबईकरांना देखील मोठा फायदा…

महामार्ग रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातून जाणार आहे. मात्र, मुंबईकरांना गोव्याला जाण्यासाठी या महामार्गाचा फायदा होणार आहे. हे आहेत महामार्गाचे टप्पे, द्रोणागिरी ते मुरूड 80 किलोमीटर, मुरूड ते बाणकोट 64 किलोमीटर, बाणकोट ते रत्नागिरी 146 किलोमीटर, रत्नागिरी ते पावस 20 किलोमीटर, पावस ते खाक्षीतिठा 69 किलोमीटर, खाक्षीतिठा ते मालवण 50 किलोमीटर, मालवण ते गोवा 65 किलोमीटर असणार आहेत. यादरम्यान महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी जवळपास दहा हजार कोंटीचा खर्च येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page