You are currently viewing देवगड तालुक्यातील तिर्लोट वि.का.स. सेवा सोसायटीवर भाजपा प्रणित पॅनेलचा झेंडा

देवगड तालुक्यातील तिर्लोट वि.का.स. सेवा सोसायटीवर भाजपा प्रणित पॅनेलचा झेंडा

देवगड /-

देवगड तालुक्यातील तिर्लोट विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने सोसायटीवर निर्विवाद विजय मिळवला आहे. भाजपा जिल्हा सचिव आरिफभाई बगदादी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तिर्लोट गावचे जेष्ठ नेते तथा माजी चेअरमन रमाकांत घाडी यांच्या नेतृत्वाखाली सदरची निवडणूक लढविण्यात आली होती. विरोधी पक्षाने ही निवडणूक प्रतिष्ठेची करून अनेक पदाधिकारी प्रचारासाठी मैदानात उतरवले होते. मात्र आरिफभाई बगदादी यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास असणाऱ्या तिर्लोट गावातील मतदारांनी आपला हक्क बजावत भारतीय जनता पक्षाच्या पॅनलला विजय मिळवून दिला. 12 पैकी 7 जागांवर आरिफ बगदादी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे संचालक निवडून आले.

आरिफभाई बगदादी यांनी तिर्लोट येथे जाऊन विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. त्यांच्या समवेत तिर्लोट गावचे सरपंच राजन गिरकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष पद्माकर घाडी, पडेल येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव वारीक तसेच ठाकूरवाडी सरपंच वलीद ठाकूर तसेच गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

अभिप्राय द्या..