कुडाळ /-

मुंबई – गोवा महामार्गावर बिबवणे येथे भरधाव वेगात – धावणारी कार कलिंगडाच्या स्टॉलमध्ये घुसून पलटी झाली. हा अपघात आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात कलिंगडाच्या स्टॉलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात सुशांत राजन नेरूरकर (वय ३०) आणि शार्दुल सुरेश पाटकर (वय २५) हे दोघे जखमी झाले. यातील नेरूरकर यांना अधिक दुखापत झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा- बांबुळी येथे हलविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page