You are currently viewing कुडाळ शहरातील ज्येष्ठ डॉ अनंत सवदत्ती यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी दुःखद निधन.

कुडाळ शहरातील ज्येष्ठ डॉ अनंत सवदत्ती यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी दुःखद निधन.

कुडाळ /-

कुडाळ शहरातील ज्येष्ठ डॉ अनंत गोपाळ सवदत्ती यांचे 08 फेब्रुवारी रोजी रात्री 11.30 वाजता वृद्धापकाळाने राहत्या घरी दुःखद निधन झाले. डाँ. सवदत्ती यांनी ग्रामिण भागात डोंगर-दरी चालत तसेच सायकलने घरी जात अडलेल्या प्रसुती यशस्वी केल्या आहेत. सर्व सामान्य गरीबांसाठी ते देवमाणुस होते. डॉक्टर म्हणून सेवाभावी वृत्तीने कुडाळ वासीयांची मन जिंकणारा व कुडाळ वासीयांवर अतोनात प्रेम करणारा एक तारा निखळला अशा भावना व्यक्त होत आहेत. बुधवारी दुपारी साडेतीन वाजता त्यांच्यावर कुडाळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अभिप्राय द्या..