You are currently viewing देवगडच्या भाजपा नगरसेवकांनी केंद्रीयमंत्री राणेंची घेतली सदिच्छा भेट.

देवगडच्या भाजपा नगरसेवकांनी केंद्रीयमंत्री राणेंची घेतली सदिच्छा भेट.

देवगड /-

देवगड नगरपंचायतीवर निवडून आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या आठ नगरसेवकांनी भाजपा नेते, केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेऊन शुभाशीर्वाद घेतले. या भेटी दरम्यान केंद्रीयमंत् नारायण राणे, भाजपा आमदार नितेश राणे, नीलम, राणे यांनी नवनियुक्त नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या.

कणकवली येथे ओमगणेश निवासस्थानी जाऊन भाजपाचे नगरसेवक शरद ठुकरुल, प्रणा माने, तन्वी चांदोस्कर, अरुणा पाटकर आद्या गुमास्ते, मनीषा जामसंडेकर, रुचाली पाटकर, स्वरा कावले यांनी भेट घेतली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, पक्ष निरीक्षक समीर नलावडे, भाजपा देवगड तालुका मंडळ अध्यक्ष संतोष किंजवडेकर, भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप साटम, देवगड शहर अध्यक्ष योगेश पाटकर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, माजी उपनगराध्यक्ष उमेश कनेरकर, राजा भुजबळ आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..