You are currently viewing राज्यकर उपायुक्त प्रतापराव अजगेकर यांचा कंजूमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्यूटर असोसिएशन सिंधुदुर्ग तर्फे सत्कार !

राज्यकर उपायुक्त प्रतापराव अजगेकर यांचा कंजूमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्यूटर असोसिएशन सिंधुदुर्ग तर्फे सत्कार !

सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वस्तू आणि सेवा कर विभागाचे राज्य कर उपायुक्त प्रताप अजगेकर 31 जानेवारी रोजी सेवानिवृत्त होत आहेत. यानिमित्त त्यांचा उचित सत्कार कन्सुमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्यूटर असोसिएशनतर्फे ओरोस जीएसटी भवन येथे करण्यात आला.* असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अरविंद नेवाळकर, जिल्हा कार्यवाह विवेक नेवाळकर, जिल्हा कोषाध्यक्ष मनोहर जोईल, कणकवली उपाध्यक्षपदी भीसाजी माणगावकर, सल्लागार परवेज नाईक कणकवली तालुका अध्यक्ष भूषण वाडेकर कुडाळ तालुकाध्यक्ष धनश्री वायंगणकर सहकार्यवाह विशांत कामत हितेश भानुशाली आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हा कार्यवाह विवेक नेवाळकर यांनी आभासी दुनियेत जीएसटी कार्यालय आणि व्यापारी यांच्यामधील दुरावा वाढत असताना श्री आजगेकर यांनी व्यापारी आणि जीएसटी कार्यालय यांच्या मधील स्नेहसंबंधचा धागा दृढ केला. व्यापारी हा आपला करदाता आहे याची जाणीव ठेवून त्यांच्या प्रती नेहमीच स्नेह समर्पण ठेवले अजगेकर यांनी आपल्या कार्यकाळात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कर उत्पन्नाचा आलेख सतत वाढता ठेवला आणि कार्याचा ठसा उमटवला अशा शब्दांत विवेक नेवाळकर यांनी गौरवोद्गार काढले. असोसिएशन तर्फे सन्मानचिन्ह तसेच शाल, श्रीफळ देऊन आजगेकर यांचा जिल्हाध्यक्ष अरविंद नेवाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. डिस्ट्रीब्यूटर संघटनेने केलेला सत्कार माझ्या घरच्यांनी केलेल्या सत्कारासारखा आहे तो मी कधीही विसरू शकणार नाही. व्यापारी हा या कार्यालयासाठी सन्मानाचा करदाता आहे याचे भान ठेवून इथला प्रत्येक अधिकारी कार्यरत असतो. हीच भावना सदैव राहिल, असे मत त्यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले साडेतीन वर्ष काम करण्याचे भाग्य मला मिळाले, येथे काम करण्याचा आनंद प्रत्येक दिवस एक नवीन ऊर्जा देणारा ठरला अशा भावोत्कट शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अरविंद नेवाळकर, भूषण वाडेकर, मनोहर जोईल यांनीही गौरवपर भाषण करून प्रताप अजगेकर यांना दीर्घायुष्याच्या सदिच्छा व्यक्त केल्या.जीएसटी कार्यालयातील वस्तू व सेवा कर अधिकारी आणि कार्यालय कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..