You are currently viewing लक्ष्मण उर्फ बाळा नाईक वै. ४ यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर..

लक्ष्मण उर्फ बाळा नाईक वै. ४ यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर..

सिंधुदुर्ग /-

फिर्यादी प्रवीण अनंत नाडकर्णी यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चेतन चव्हाण, बाळा नाईक, पराशर सावंत, शैलेश दळवी व प्रवीण गवस आणि १० ते १५ व्यक्ती यांच्या विरुध्द भा. द. वी. कलम ३०७ ३२४, ३२३, १४३, १४८, १४७, १४८, १४९ १८८४२७५०४ व ५०६ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (अ) आणि १३५ अन्वये पो. र. नं. २ / २०२२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.त्याकाळी मुंबई उच्चन्यायालयाने बाळा नाईक, पराशर सावंत, शैलेश दळवी व प्रवीण गवस यांना अटक झाल्यास त्यांची काही अटी व शर्तीवर तसेच रक्कम रुपये २५,०००/- च्या वैयक्तीक जाचमुचलक्यावर व १ किंवा २ व्याक्तींच्या जामीनकीवर मुक्तता करण्याचा आदेश दिले.आरोपीतर्फे जिल्हा सत्र न्यायालयात अॅड. एस. एन. उर्फ अजित भणगे, अॅड. मिहिर भणगे, अॅड. सुनिल माळवणकर व मुंबई उच्च न्यायालयात अॅड. चैतन्य पेंडसे यांनी काम पाहीले.

यातील हकीकत अशी की, फिर्यादी प्रवीण अनंत नाडकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार तो व त्याचा पुतण्या दिनांक ०२.०१.२०२२ रोजी रात्री १०.२० वाजता आपल्या गाडीने घरी जात होते. वाटेत दोडामार्ग एस. टी. स्टॅंड जवळ ते आपला भाऊ एकनाथ याची वाट पाहत थांबले. फिर्यादी हा गाडीच्या बाहेर येऊन आपल्या भावाची वाट पाहत असता चेवन चव्हाण,बाळा नाईक, पराशर सावंत, शैलेश दळवी व प्रवीण गवस आणि १० ते १५ इसम काठ्या व दगड घेऊन आले. त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ व धमकी दिली व व्यांच्या पैकी कोणीतरी काठीने डोक्यावर मारहाण केली. त्यामुळे तो खाली पडला. इतरांनी दगड व इतर साहीत्य मारले तसेच गाडीची काचही फोडळी. फिर्यादीला दोडामार्ग सरकारी दवाखान्यात औषधोपचार करण्यात आला. त्यानुसार पोलीसानी गुन्हा दाखल केला. फिर्यादीत नमुद्र केलेल्या व्यक्तींपैकी बाळ नाईक, पराशर सावंत, शैलेश दळवी व प्रवीण गवस यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटक पूर्व जामीनासाठी अर्ज केला.तो फेटाळण्यात आला. त्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात वरील चौघांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. सदरील अटक पूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाचे सन्माननीय न्यायमुर्ती श्री. सि. व्ही. भडंग यांनी मंजुर केला. आरोपीतर्फे जिल्हा सत्र न्यायालयात अॅड. एस. एन. उर्फ अजित भणगे, अॅड. मिहिर भणगे, अॅड. सुनिल मालवणकर व मुंबई उच्च न्यायालयात अॅड. चैतन्य पेंडसे यांनी काम पाहीले.

प्रतिक्रिया व्यक्त करा