You are currently viewing कणकवली बीडीओ अभिजित हजारे यांची नायब तहसीलदारपदी नियुक्ती.

कणकवली बीडीओ अभिजित हजारे यांची नायब तहसीलदारपदी नियुक्ती.

सिंधुदुर्ग /-

कणकवली पं स चे प्रभारी बीडीओ तथा एबीडीओ अभिजित हजारे यांची एमपीएससी मार्फत नायब तहसीलदारपदी नियुक्ती झाली असून कणकवली पं स च्या अधिकारी ,कर्मचाऱ्यांच्या वतीने हजारे यांना निरोप देत भावी प्रशासकीय कारकिर्दीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मनोगत व्यक्त करताना हजारे म्हणाले की एमपीएससी होणे हे माझे स्वप्नं होतं. ते स्वप्न मी एबीडीओ पद मिळवून पूर्ण केले. कणकवली पं स च्या माध्यमातून माझी प्रशासकीय कारकीर्द सुरू झाली. कणकवली हा घडामोडी असणारा तालुका आहे. महसूल विभागातील प्रशासकीय कारकीर्द सिंधुदुर्ग जिल्ह्यातच सुरु करण्याची माझी ईच्छा आहे.यावेळी विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग यांनी अभिजित हजारे यांच्या प्रशासकीय कारकिर्दीचा आढावा घेताना एमपीएससी मार्फत थेट नियुक्ती असूनही त्यांनी कधी कुठलाही बडेजाव न दाखवता कनिष्ठ ते वरिष्ठ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी अत्यंत सलोख्याचे संबंध जोपासले. पंचायत राज समितीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी घेतलेली मेहनत आणि प्रशासकीय कामाचा निपटारा उल्लेखनीय असल्याचे वारंग यांनी सांगितले. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडग हे गाव असलेल्या अभिजित हजारे यांनी कॉम्प्युटर सायन्स मध्ये बी टेक इंजिनिअरिंग चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर एमपीएससी चा ध्यास घेतला. स्वरूपवर्धिनी या संस्थेद्वारे स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या युवकांसाठी पूर्वतयारी करिता शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी एक प्रवेश परीक्षा घेऊन केवळ 50 विद्यार्थी निवडून त्यांना एमपीएससी मार्फत अधिकारी होण्यासाठी सर्वतोपरी तयार केले जाते. स्वरूपवर्धिनी ची शिष्यवृत्ती मिळवून हजारे यांनी 2 वर्षे अभ्यास केला.2017 साली हजारे यांची एमपीएससी मार्फत सहाय्यक बीडीओ पदी निवड होऊन ते कणकवली पं स मध्ये एबीडीओ म्हणून रुजू झाले. सध्या त्यांच्याकडे कणकवली पं स चा बीडीओ पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. एबीडीओ पदी निवड झाली तरी हजारे यांची महत्वाकांक्षा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यानंतरही त्यांनी एमपीएससी स्पर्धा परीक्षा अभ्यास सुरूच ठेवला होता. जून 2020 मध्ये च्या एमपीएससी परीक्षेत त्यांची नायब तहसीलदार पदी महसूल विभागात निवड झाली आहे.यापुढेही एमपीएससी द्वारे पुढील अधिकारी पदाच्या स्पर्धा परीक्षा देण्याचा मानस नायब तहसीलदार अभिजित हजारे यांनी आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूजशी बोलताना व्यक्त केला. यावेळी कक्ष अधिकारी जयदीप सावंत, ओटव सरपंच हेमंत परुळेकर, गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, सरपंच हेमंत परुळेकर, सभापती स्वीय सहाय्यक बापू सावंत तसेच सर्व विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा