खारेपाटण /-

कणकवली तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खारेपाटण शहरातील शिवजीपेठ येथील खारेपाटण व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपद खारेपाटण येथील प्रसिद्ध रॉकेल विक्रेते प्रतिष्ठित व्यापारी वीरेंद्र बाळकृष्ण चिके यांची नुकतीच सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल खारेपाटण दशक्रोशीत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. वीरेंद्र चिके यांनी खारेपाटण गावचे सरपंच पद भूषविलेले असून गुरववाडी संभाजी नगर येथील सामाजिक क्रीडा मंडळात देखील त्यांनी कार्यकर्ता म्हणून काही काळ काम केले होते.

खारेपाटण व्यापारी असोसिएशनची वार्षिक सभा नुकतीच श्री देव विष्णू मंदिर बाजारपेठ खारेपाटण येथे माजी अध्यक्ष श्री. केतन आलते यांच्या अध्यक्षतेखाली सम्पन्न झाली. यावेळी पुढीलप्रमाणे खारेपाटण व्यापारी असोसिएशनची नवीन कार्यकारणी निवडण्यात आली. अध्यक्ष – वीरेंद्र बाळकृष्ण चिके, उपाध्यक्ष – चंद्रकांत विठोबा शेट्ये, सेक्रेटरी – रमेश बिष्णू जामसंडेकर, खजिनदार – संजय सुमंगल धाक्रस यांची निवड करण्यात आली तर सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ कार्यकारणी सदस्यपदी योगेश सुरेश गोडवे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

खारेपाटण व्यापारी असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीचे सर्व व्यापारी बांधावाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले. तर पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. “खारेपाटण येथील व्यापारी बांधवाचे विविध प्रश्न असोसिशनच्या माध्यमातून आपण सोडविणार असून सर्वांना विश्वास घेऊन खारेपाटण गावचा व येथील व्यापारी वर्गाचा विकास कसा करता येईल या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे खारेपाटण व्यापारी असोसिएशनचे नूतन अध्यक्ष वीरेंद्र चिके यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page