You are currently viewing सामाजिक वनीकरण वनपरिक्षेत्र कुडाळ यांच्या मार्फत सायकल रॅलीचे आयोजन..

सामाजिक वनीकरण वनपरिक्षेत्र कुडाळ यांच्या मार्फत सायकल रॅलीचे आयोजन..

कुडाळ /-

सामाजिक वनीकरण विभाग सिंधुदुर्ग वनपरिक्षेत्र कुडाळ यांच्या मार्फत आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत सायकल रँलीचे आयोजन कुडाळ येथे करण्यात आले.यावेळी विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण सिंधुदुर्ग श्री. सुभाष पुराणिक यांनी सिंधुदुर्ग सायकल असोसिएशन ग्रृप यांना निसर्गाबद्दल माहिती दिली.जैवविविधता तसेच नष्ट होत चाललेली औषधी वनस्पती याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.सायकल रँली घेऊन इंधन वाचवणे व पर्यायाने निसर्गाचे संवर्धन संरक्षण करणे हा एक उद्देश असलेबाबत माहिती दिली. सहभाग घेतलेल्या सायकल स्वारांना प्रमाणपत्र देवून सन्मानित करणेत आले.

सदर कार्यक्रमास विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग सिंधुदुर्ग श्री. सुभाष पुराणिक,वनक्षेञपाल सामाजिक वनीकरण कुडाळ योगेश सातपुते, वनक्षेत्रपाल कुडाळ अमृत शिंदे, वनपाल सुनील सावंत व वनरक्षक रोहित मायणीकर, वनरक्षक सावळा कांबळे, तसेच डॉ. बापू परब, श्री. गजानन कांदळगावकर, श्री, रुपेश तेली, सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन आणि श्री. किशोर सरनौबत यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी जिल्ह्यातील सिंधुदुर्ग सायकल असोसिएशन ग्रृपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभिप्राय द्या..