कुडाळ /-
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उमेदवार प्रकाश मोर्ये अध्यक्ष असलेल्या सर्वोदय पतसंस्थेचे चाचणी करण्यात आली असून त्या संस्थेचे लेखापरीक्षणाचे आदेश- देण्यात आले आहेत. एकंदर श्री.दादा बेळणेकर यांच्या प्रयत्नाना यश मिळाले असे म्हणावे लागणार आहे.सर्वोदय पतसंस्थेचे लेखापरीक्षण व्हावे अशी तक्रार संस्थेचे संचालक दादा बेळणेकर यांनी मागणी केली होती.आणि ती मागणी त्यांनी चांगलीच लावून धरली होती.भाजपने श्री.प्रकाश मोर्येनी आपल्या अध्यक्ष पदाचा गैरवापर केला होता.त्यामुळे भविष्यात प्रकाश मोर्ये अध्यक्ष असलेली संस्था अडचणीत येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही अशी भीती आहे.श्री प्रकाश मोर्ये हे जिल्हा बँकच्या उमेदवार म्हणून रिंगणात आहेत आणि आपणच जिल्हा बँकेचे अध्यक्ष होणार असा प्रचार प्रकाश मोर्ये करत आहेत.सध्या ज्या प्रकाश मोर्येना साधी एक पतसंस्था सांभाळायला जमत नाही आणि ते जिल्हा बँक ची निवडणूक लढवता आहेत.एका पतसंस्थेत त्यांचे एवढे पराक्रम मग जिल्हा बँकेत काय दिवे लावले असतील याची कल्पना येते.दुसऱ्यांच्या नावाने बोंब मारण्यापेक्षा स्वतः ची माणस ज्यांना आपण उमेदवारी दिलंय त्यांचे पण पराक्रम बघा स्वतःची घर भरणारे जिल्हा बँकेचे उमेदवार प्रकाश मोर्ये आणि त्यांचे नेते दुसऱ्यांवर टीका करता आहेत.ज्यांच्या अध्यक्ष म्हणून कार्यकाळाची लेखापरीक्षण चौकशी होतेय या वरून त्यांच्या कार्याची आपल्याला कल्पना येईल.अश्या माणसांना आपण मतदान करणार का ? अश्या माणसांना जिल्हा बँकेवर संचालक म्हणून पाठवणे कितपत योग्य आहे.आपण सर्व जिल्हा बँकेचे सुज्ञ मतदार असल्या प्रवृत्तीच्या माणसांना मदत करणार का ? असा प्रश्न मतदार वर्गात निर्माण झाला आहे.
