वेंगुर्ला /-


नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय एकता दिनाच्या’ औचित्याने आयोजित खुल्या चित्रकला स्पर्धेत कुडाळ येथील विष्णुप्रसाद सावंत यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर खुल्या स्लोगन लेखन स्पर्धेत योगिता नवार (वेंगुर्ला) यांनी प्रथम क्रमांक प्राप्त करीत यश संपादन केले.सदर स्पर्धेचे उद्घाटन बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ले अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.एम.बी. चौगुले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व सरदार वल्लभभाई पटेल व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर एकात्मिक महिला व बालविकास योजना विस्तार अधिकारी जयेश राऊळ, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, उपाध्यक्ष नाना राऊळ,वैभवी सोकटे,गणेश सावंत, सागर सावंत, सदाशिव सावंत, निखिल ढोले, किरण राऊळ, रोहन राऊळ,अक्षता गावडे,यशवंत राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकत आज कोरोना सारख्या काळातही भारत आपले सार्वभौमत्व टिकून आहे,अशा एकतेसाठी कार्य करणाऱ्या अनेक संस्था असून त्यामध्ये प्रतिष्ठान आहे,त्यांचे मी सदैव कौतुक करतो असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे डॉ. एम.बी. चौगले यांनी केले. यावेळी उपस्थित युवक युवतींना राष्ट्रीय एकता अखंडित राखण्यासाठी शपथ देण्यात आली.चित्रकला स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे: प्रथम – विष्णुप्रसाद सावंत (कुडाळ) , द्वितीय – तुकाराम गोसावी (रेडी), तृतीय – पूर्वा चांदरकर ( सावंतवाडी), उत्तेजनार्थ प्रथम- विजेता आईर (कुडाळ), उत्तेजनार्थ द्वितीय- सुजल परब (सावंतवाडी) यांनी यश संपादन केले.’राष्ट्रीय एकता’ या विषयावर आयोजित केलेल्या स्लोगन स्पर्धेमध्ये प्रथम – योगिता नवार (वेंगुर्ला), द्वितीय- धनश्री भोवर ( बृहम महाराष्ट्र कॉमर्स कॉलेज, पुणे), तृतीय- आराधना साटम (कणकवली, उत्तेजनार्थ प्रथम- लविना डिसोझा ( वेंगुर्ला), उत्तेजनार्थ द्वितीय – माधुरी खराडे ( भाडगाव हाय. कुडाळ) यांनी यश संपादन केलं.चित्रकला स्पर्धेचे परीक्षण कलातज्ञ स्वप्नांजली गावडे यांनी केले. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते मेडल, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सचिन परुळकर तर आभार गुरुदास तिरोडकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page