कुडाळ /-

यातील हकीगत अशी की, कुडाळ शहरात रहाणारे घरमालक श्री. सुनिल उर्फ विठ्ठल काशिनाथ धुरी यांनी आपल्या घराच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम करण्यासाठी श्री. दिलीप परशुराम मांजरेकर यांना कंत्राट दिलेले होते. दिनांक ३०.१२.२०१५ रोजी मुकादम श्री. दिलीप परशुराम मांजरेकर यांचा कामगार पुंडलिक खेगाप्पा राठोड हा पहिल्या मजल्यावरचे चिरेबंदी बांधकाम करत होता. सदरचे बांधकाम करण्यास मुकादम श्री. दिलीप परशुराम मांजरेकर यांनी सांगितले व वे निघून गेले. व्यानंतर कामगार राठोड हा बांधकाम करीत असताना धुरी यांच्या घराच्या बाजूने जाणाऱ्या उच्च दावाच्या विद्युत वायरला त्याचा स्पर्श होऊन तो मयत झाला. त्यामुळे कुडाळ पोलीसांनी घरमालक श्री. सुनिल धुरी व गुकादम श्री. दिलीप मांजरेकर यांनी दाखविलेल्या निष्काळजी व बेजबाबदारपणामुळे कामगार श्री. पुंडलिक खेमाप्पा राठोड हा मयत झाला म्हणून व्यांच्याविरुध्द भा.द.वि. कलम ३०४ [अ] सह ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. व्याकामी अति सत्र न्यायाधीश नं. २ श्री. आर. वी. रोटे साहेब यांनी घरमालक श्री. धुरी व मुकादम श्री. मांजरेकर यांची सवळ पुराव्याअभावी त्यांच्यावर दाखल असलेल्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे अॅड. एस. एन. उर्फ अजित भणगे, अँड. मिहिर भणगे व अॅड. स्वप्ना सामंत, अॅड. सुनिल मालवणकर व अॅड. मधुरा सबनीस यांनी काम पाहीले.

प्रथमतः ही केस प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साहेब, कुडाळ यांचे न्यायाळ्यात चालली. व्याकामी सदर न्यायालयाने घरमालक व मुकादम यांना प्रत्येकी रुपये पाच हजार दंड केला व दंडाची रक्कम गयत कामगार पुंडलिक खेमाणा राठोड याची पत्नी श्रीम. सोनुवाई हिस देण्याचा आदेश केला. त्या आदेशाने व्यथित होऊन दाखल केलेले अपिल अति सत्र न्यायाधीश नं. २ यांचेसमोर चालले. व्याकामी झालेल्या युक्तीवादात अॅड. अजित भणगे यांनी प्रामुख्याने असे मुद्दे मांडले की, यात घरमालक किंवा मुकादम यांचा कोणताही निष्काळजीपणा दिसून येत नाही. प्रत्यक्ष काम करताना दोन्ही आरोपी तेथे हजर नव्हते. उच्चदाव विद्युत वाहिनी ही दृष्य स्वरुपात होती. शिवाय सहाय्यक अभियंता म. रा. वि. वि. कं. मर्या. शां. का. कुडाळ शहर यांनी तात्पुरत्या स्वरुपात दोन्ही वाहिन्या थोडया बाहेर सरकवून व्यावर पाईप टाकण्यात आलेले होते. एवढेच नव्हेतर स्थाच खर्चही जमिन मालकाकडून क्यूल करण्यात आलेला होता. प्रथमदर्शनी मयत कामगार राठोड याचा निष्काळजीपणा व्याच्या मृत्युस कारणीभुत ठरल्याचे दिसून येणारे आहे. न्यायालयापुढे आलेले तोंडी व लेखी पुरावे यांचा विचार करून अति सत्र न्यायाधीश नं. २ श्री. आर. बी. रोटे साहेब यांनी अपिल मंजूर केले व आरोपींना संशयाचा फायदा देऊन व्यांची सवळ पुराव्याअभावी मुक्तता केली तसेच जी दंडात्मक रक्कम अन्वीक्षा न्यायालयाने ठोठाविळेली होती ती दोन्ही आरोपींना परत करण्याचा आदेश करण्यात आला. याकामी आरोपीतर्फे अॅड. एस. एन. उर्फ अजित भणगे, अॅड. मिहिर भणगे व अॅड. स्वप्ना सामंत, अॅड. सुनिल माळवणकर व अॅड. मधुरा सबनीस यांनी काम पाहीले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page