सावंतवाडी /-

संजू परब यांना मी ते नगराध्यक्ष नव्हते तेव्हापासून ओळखतोय.मात्र, नगराध्यक्ष झाल्यानंतर इतक्या कमी वेळात त्यांना प्रशासन समजलं,प्रशासनावर पकड जमवली, शहरात कोट्यवधींची कामे केली. त्यामुळे मला त्यांच्या कामाबद्दल मला त्यांचा सार्थ अभिमान आहे. कारण त्यांनी हे काम करत असताना नेहमीच राजकारण बाजूला ठेवलं. माझ्या शहराला जी गरज आहे त्यात राजकारण येता कामा नये हे त्यांनी नेहमी पाहिल.

मात्र, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व काम करत असताना संजू परब यांनी महाराजांचे संस्कार कधीही विसरले नाहीत किंवा महाराज यांनाही विसरले नाहीत. मी ज्यावेळी सावंतवाडी लिहायचं त्या त्यावेळी त्यांची एकच आग्रही मागणी असायची ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आपल्याला उभारायचा आहे आणि आज त्यांच्याच नाही तर तमाम सावंतवाडी करांच्या मनातील इच्छा पूर्ण होत असताना या पुतळ्याचे भूमिपूजन माझ्या हस्ते व्हावं हे मी माझं भाग्य समजतो व यासाठी संजू परब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आपण नेहमीच ऋणी राहीन, अशा शब्दात भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी संजू परब यांच्या कार्याचा गौरव केला. सावंतवाडी नगरपालिकेच्या शिव उद्यानात आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page