You are currently viewing राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी झुंजार मित्रमंडळ आयोजित नवरात्रोत्सवात घेतले दुर्गामातेचे दर्शन..

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी झुंजार मित्रमंडळ आयोजित नवरात्रोत्सवात घेतले दुर्गामातेचे दर्शन..

कणकवली/-

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी खारेपाटण येथील झुंजार मित्रमंडळ आयोजित नवरात्रोत्सवाला भेट देत देवीचे दर्शन घेतले. यावेळी अमित सामंत यांचा शाल श्रीफळ देऊन मंडळाचे अध्यक्ष संकेत शेट्ये यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. तसेच दुर्गामतेच्या आरतीचा मान अमित सामंत यांना देण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुकांत वरुणकर, गोट्या कोळसुलकर, उपाध्यक्ष संजय कोळसुलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. खारेपाटण शिवाजी पेठेतील विष्णूमंदिरात झुंजार मित्रमंडळाच्या वतीने दुर्गामाते चे झुंजार मित्रमंडळाच्या वतीने केले जाते. यावेळी बोलताना अमित सामंत यांनी झुंजार मित्रमंडळाचे कौतुक केले. सर्वपक्षीय कार्यकर्ते एकोप्याने देविमातेचा उत्सव साजरा करतात ही आनंदाची बाब आहे. झुंजार मित्रमंडळाच्या वतीने मागील 28 वर्षे नवरात्रोत्सव गुण्यागोविंदाने साजरा होत आहे. झुंजार मित्रमंडळाचे कार्य नक्कीच स्पृहणीय आहे अशा शब्दांत सामंत यांनी मंडळाचे कौतुक केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपल्या वैयक्तिक स्तरावर मंडळाला सामाजिक कार्यासाठी आपले नेहमीच सहकार्य असेल अशी ग्वाही सामंत यांनी दिली.यावेळी मंडळाचे सदस्य दिगंबर राऊत, संतोष गाठे, कुमार कोळसुलकर, संकेत लोकरे, भूषण कोळसुलकर, सिंदूर लवेकर, श्रीजय कोळसुलकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..