मुंबई /-

गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी पुणे-बंगळुरू महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीच्या पाण्यात जात आहे. जुलै महिन्यात महामार्गावर पाणी आल्याने चार दिवस संपूर्ण वाहतूक ठप्प होती. त्यामुळे यावर कायमस्वरुपी तोडगा काढणे महत्वाचे आहे.या पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथील एका कार्यक्रमात नवीन पुणे-बंगळुरू महामार्ग बांधणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.पुणे-बंगळुरू महामार्ग यापुढे कधीच महापुराच्या पाण्यात जाणार नाही याची खात्री देतो, असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.याच भाषणात कोल्हापूर-सांगली या रस्त्याचे पुढच्या सहा महिन्यात भूमिपूजन करून काम सुरू करु, असे आश्वासनही गडकरींनी दिलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page