You are currently viewing मडूरा तिठा येथील गॅरेज मधील मोटारसायकल गेली चोरीस

मडूरा तिठा येथील गॅरेज मधील मोटारसायकल गेली चोरीस

बांदा /-

मडूरा तिठा येथून मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. येथील नाईक ऑटोमोबाईल्समध्ये बॉक्सर – 80 (एमएच ०७ ई १२९१) ही मोटारसायकल दुरुस्तीकरीता ठेवली होती. ती अज्ञात चोरट्याने पळवून नेली आहे. याबाबतची फिर्याद बांदा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. गॅरेज मालक दिनेश नाईक यांच्या वडिलांचे निधन झाल्याने गॅरेज बंद होते. ही संधी साधून गॅरेज बाहेर लावलेली मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. ही मोटरसायकल कोठेही आढळल्यास बांदा पोलीस (०२३६३ २७०२३३) किंवा दिनेश नाईक (९४२११४५३१४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा