You are currently viewing सिंधुदुर्गाला कायमस्वरूपी लवकरात लवकर विभाग नियंत्रकाची नेमणूक करावी जेडी नाडकर्णी..

सिंधुदुर्गाला कायमस्वरूपी लवकरात लवकर विभाग नियंत्रकाची नेमणूक करावी जेडी नाडकर्णी..

कुडाळ /-


सध्या सिंधुदुर्गाला विभाग नियंत्रक नसल्यामुळे सिंधुदुर्ग विभागाची परिस्थिती आंधळ दळतय कुत्र पीठ खातय अस झालेली आहे.सिंधुदुर्गाला दोन वर्ष सयाजीराव विभाग नियंत्रक दिला गेल्यामुळे जिल्ह्याची स्थिती बिकट झालेली होती व त्यात एम ओ यु पदाची बढती देऊन थोड्या वाडीव पगारामध्ये विभाग नियंत्रक पद ,एसटी प्रशासन भरू शकले असते ,पण बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा रिटायर्ड माणसाला त्या जागेवर बसून याआधीच एसटी प्रशासनाने स्वतःचे खूप नुकसान केलेले आहे व सध्या स्थिती मध्ये ते पद रिकामे असून अनेक काम प्रलंबित आहेत
तरी महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे अशी मागणी आहे की, सदर पद लवकरात लवकर भरून रेंगाळलेली कामे मार्गी लावा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गणेशोत्सवाच्या काळात नाहीतर अनेक मोठ्या समस्या उद्भवणारे आहेत

अभिप्राय द्या..