You are currently viewing जिल्हा बँकेचे विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर.;जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांची कुडाळ येथे पत्रकार परिषदेत माहिती..

जिल्हा बँकेचे विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर.;जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांची कुडाळ येथे पत्रकार परिषदेत माहिती..

कुडाळ /-

सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, सहकारी संस्था पदाधिकारी, सहकारातील कर्मचारी व शेतकरी यांना काम करणेस प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांच्या पाठीवर कौतुकाची/प्रोत्साहनाची थाप मिळणे आवश्यक असते. त्यासाठी बँक सहकार वर्षात ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे अशा जिल्हयातील सहकारी संस्था, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सहकारातील कर्मचारी व शेतकरी यांना जिल्हा बँकेमार्फत प्रोत्साहनात्मक पुरस्कार योजना सन २०१६ पासून सुरू करणेत आलेली आहे. यावर्षीच्या पुरस्कारानुषंगाने संस्थांकडून प्रस्ताव मागविणेत आलेले होते. प्राप्त प्रस्तावांची छाननी करण्यासाठी बँकेने तज्ञ व्यक्तींची पुरस्कार निवड समिती गठीत केलेली होती. या पुरस्कार निवड समितीने उत्कृष्ट सहकारी संस्था, उत्कृष्ट सह. संस्था पदाधिकारी, उत्कृष्ट सह. संस्था कर्मचारी व कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलेले शेतकरी यांचे कार्य व त्यांनी केलेल्या कामकाजाचे मुल्यमापन करून खालीलप्रमाणे संस्था व व्यक्तिंची सन २०२१ च्या पुरस्कारासाठी निवड केलेली आहे. तसेच मा. ब्रिगेडीयर सुधीर सिताराम सावंत, माजी खासदार यांची जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड केलेली आहे.

कै. शिवराम भाऊ जाधव स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा उत्कृष्ट सहकारी संस्था पुरस्कार ,सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सिंधुदुर्ग मु.पो.व ता. सावंतवाडी,

के केशवरावजी राणे स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा उत्कृष्ट सहकारी संस्था पदाधिकारी पुरस्कार “”श्री. भालचंद्र केशव वारंग अध्यक्ष, तुळसुली विकास से.सो.लि. तुळसुली, ता. कुडाळ.

  1. कै.डी. बी. ढोलम स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा उत्कृष्ट सहकारी संस्था कर्मचारी पुरस्कार,श्री कृष्णा दामोदर कर्ले, मु.पो. नडगिवे, ता. कणकवली सेक्रेटरी, खारेपाटण गट विकास से सो.लि. खारेपाटण ता. कणकवली
  2. कै. भाईसाहेब सावंत स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा कृषीमित्र पुरस्कार,श्री. राजाराम यशवंत मावळणकर (काजू व्यावसायीक) कडाशी.

कै. बाळासाहेब सावंत यांचे स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा “जीवन गौरव” पुरस्कार,मा. ब्रिगेडीयर सुधीर सिताराम सावंत माजी खासदार

हे सर्व ‘ पुरस्कार वितरण सोहळा ” बँकेच्या मा.वार्षिक सर्वसाधारण सभेचे दिवशी केला जाणार आहे. या पुरस्कारांची घोषणा बँकेचे अध्यक्ष श्री. सतिश सावंत यांनी आज १४ ऑगस्ट रोजी जाहीर केले आहेत.यावेळी व्य|सपीटावर संचालक विद्याप्रसाद बांदेकर ,आत्माराम ओटवणेकर ,सौ.नीता राणे, प्रमोद धुरी ,जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अनिरुद्ध देसाई ,पुरस्कार निवड समितीचे सदस्य डॉ.प्रसाद देवधर ,जेष्ठ पत्रकार विजय शेट्टी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा