बांदा /-
बांदा-दोडामार्ग रस्त्यासाठी आज भाजपने जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे. प्रशासनाकडून जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन स्थगित करणार नसल्याचा इशारा यावेळी राजन तेली यांनी दिला. ही प्राथमिक आंदोलनाची सुरुवात असून निष्क्रिय राज्य शासनाला व प्रशासनालास जाग येण्यासाठी उद्यापासून जिल्हाव्यापी उग्र आंदोलन करण्याचा इशारा तेली यांनी यावेळी दिला. यावेळी पालकमंत्री उदय सामंत व आमदार दीपक केसरकर हे नष्क्रिय लोकप्रतिनिधी असल्याचा आरोप करण्यात आला.
यावेळी उपस्थित असलेले शाखा अभियंता विजय चव्हाण यांना भाजप पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरले. केवळ आश्वासने नको, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना याठिकाणी बोलावून ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी तेली यांनी महाविकास आघाडी शासन, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर यांच्यावर चौफेर टीका केली. यावेळी सरपंच अक्रम खान, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, नगराध्यक्ष संजू परब, सभापती शर्वणी गावकर, एकनाथ नाडकर्णी, श्वेता कोरगावकर, उपसभापती शीतल राऊळ, सावंतवाडी शहर अध्यक्षा मोहिनी मडगावकर, महेश धुरी, डी. के. सावंत, बाळू सावंत, मकरंद तोरसकर, जावेद खतीब, मधू देसाई, दादू कविटकर, तांबोळी सरपंच अभिलाष देसाई, शेखर गावकर, विकी कदम, शाम सावंत, गुरू सावंत, प्रियांका नाईक, किशोरी बांदेकर, माधवी गाड, राखी कलांगुटकर, गौरी बांदेकर, प्रवीण देसाई, विनेश गवस यांच्यासह सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.