सिंधुदुर्ग /-

जिल्ह्यातील अंगणवाडी मुलांना गेल्या सहा महिन्यांपासून पोषण आहार मिळालेला नसल्याची बाब महिला व बाल कल्याण समितीत उघड झाली आहे. थकीत पोषण आहार एकदम पुरविण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत. सहा महिन्याचा आहार एकाचवेळी पुरविल्याने त्याचा दर्जा राहणार का ? असा प्रश्न करीत सदस्यांनी जुलै महिन्याचे पॅकिंग असले तरच या आहाराचे वितरण करा, अशा सक्त सूचना देण्यात यावेळी आल्या.

जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीची सभा सभापती शर्वाणी गांवकर यांच्या अध्यक्षतेखाली बॅ नाथ पै सभागृहात संपन्न झाली. यावेळी महिला व बालकल्याण अधिकारी तथा समिती सचिव अमोल पाटील, सदस्य पल्लवी राऊळ, संपदा देसाई, वर्षा कुडाळकर, श्वेता कोरगांवकर यांच्यासह बाल विकाल प्रकल्प अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अंगणवाडी पोषण आहार पुरवठ्या वरून महिला व बाल कल्याण समितीच्या सभेत सदस्यांनी आक्रमक भूमिका मांडली. सहा-सहा महिन्याचा आहार एकाचवेळी पुरविल्याने त्याच्या दर्जाची जबाबदारी कोण घेणार ? असा प्रश्न संपदा देसाई यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page