You are currently viewing सोनुर्ली ( पाक्याचीवाडी ) येथील नवयुवक कला क्रीडा मंडळाकडून पूरग्रस्तांना मदत…

सोनुर्ली ( पाक्याचीवाडी ) येथील नवयुवक कला क्रीडा मंडळाकडून पूरग्रस्तांना मदत…


सावंतवाडी /-

सामाजिक कार्यांमध्ये नेहमी अग्रेसर असणाऱ्या सोनुर्ली ( पाक्याचीवाडी ) येथील नवयुवक कला क्रीडा मंडळाने पुन्हा एकदा आता नवा आदर्श घालून देत 23 जुलै रोजी सावंतवाडी तालुक्यातील तेरेखोल नदीच्या महापुरा मध्ये नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे करत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. सह्याद्रीच्या कुशीतून वाहणाऱ्या तेरेखोल नदीला 23 जुलै रोजी महापूर आला आणि या महापुरा मध्ये नदी तीरावरील गावांना जोरदार फटका बसतांना त्यांच्या घरामध्ये पुराचे पाणी जाऊन कधी न भरून येणारे अपरिमित असे नुकसान झाले. पोटाची खळगी भरण्यासाठी शेतात पिकऊन घरात ठेवलेले धान्य, भांडीकुंडी,कपडालत्ता, किमती वस्तू आधी सर्व पाण्यात भिजून गेले, नुकसानीची दाहकता पाहून अनेक संस्था, मंडळे,राजकीय पुढारी सामाजिक कार्यकर्ते या नुकसानग्रस्तांच्या मदतीला धावले अनेकांनी आपापल्या परीने नुकसानग्रस्तचे अश्रू पुसण्यासाठी प्रयत्न केले, सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील नवयुवक कला-क्रीडा मंडळाकडूनही या नुकसानग्रस्तांना मदत म्हणून खारीचा वाटा उचलण्याचा आला, या मंडळाच्या माध्यमातून विविध संस्था तसेच दानशूर व्यक्तीनी केलेल्या तब्बल 50 हजार रुपयांच्या आर्थिक मदतीमधून जीवनावश्यक वस्तू मदत देण्यात आली. इन्सुली,ओटवणे,वाफोली बांदा,सरमळे,विलवडे या भागातील 56 कुटुंबाना ही मदत वाटप करण्यात आली.या भागामध्ये अनेकांकडून मदतीचा ओघ सुरू आहे मात्र अद्याप पर्यंत ज्यांना मदत पोहोचलेली आहे अशांना मंडळाच्या माध्यमातून मदत पोचवण्याचा भार मंडळाच्या सदस्यानी उचलला, मंडळाने केलेली ही मदत स्वीकारतांना अनेकांनी आनंदाश्रू काढत मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष संतोष ओटवणेकर, सत्यवान हिराप, सचिन साळगावकर,सत्यवान नाईक, दाजी अणावकर, सदू मसुरकर, अमोल सावंत,राजन मठकर आधी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..