कणकवली /-
नाटळ येथील साईलिला हॉस्पिटलला कणकवली पोलीस स्टेशनचे ए. पी. आय. खंडागळे, कोळी आणि शिवाजी पाटील यांनी भेट देवून हॉस्पिटलची पाहणी केली आणि कोविड काळात देत असलेल्या सेवेबद्दल संपूर्ण स्टाफचे कौतुक केले. नाटळ येथील साईलिला हॉस्पिटल हे कोविड काळात नाटळवासिय तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी आशेचा एक किरण बनून पुढे आले. येथील कोविड केअर सेंटरही रुग्णांसाठी प्रामाणिकपणे कार्यरत आहे. यावेळी हॉस्पिटल जीव्हीएनआर साईलिलाचे सचिव डॉ. पराग मुंडले, जीव्हीएनआरचे महाराष्ट्र पोर्ट फोलियो हेड डॉ. सागर गायकवाड, डॉ. श्रेष्टी, डॉ. तेजस, डॉ. मराठे, डॉ. रासम व हॉस्पिटलचा इतर स्टाफ उपस्थित होता.