ब्युरो न्यूज /-
आता घरच्या घरीच स्वत:च कोरोनाची चाचणी आपल्याला करता येणार आहे. ICMR कडून गाईडलाईन जारी करण्यात आल्या आहेत.
याकरिता घरच्या घरी रॅपिड अंटिजेन किट्स द्वारे कोरोना चाचणी करण्यास इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने परवानगी दिली आहे.
यासाठी आयसीएमआरने काही अटी घातल्या आहेत. यानुसार कोण कोण कोरोना टेस्ट आपल्या घरी करू शकतात याच्या गाईडलाईन जारी करण्यात आल्या आहेत.
यात केवळ कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या व्यक्ती आणि कोरोना बाधिताच्या थेट संपर्कात आलेल्या व्यक्तीच त्यांच्या घरीच रॅपिड अँटिजेन किट घेऊन कोरोना चाचणी करू शकणार आहेत. महत्वाचे म्हणजे हा कोरोनाबाधित परनावगी असलेल्या लॅबोरेटरीमधील चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आलेला असायला हवा. तसेच अंदाधुंद म्हणजेच अंदाज घेण्यासाठी किंवा शंका असल्यास चाचणी करण्यास सुचविण्यात आलेले नाही. जे व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह येतील त्यांना खरे पॉझिटिव्ह रुग्ण मानले जाणार आहे. त्यासाठी पुन्हा चाचणी गरजेची नाही. तसेच जे लक्षणे असलेले व्यक्ती रॅटमध्ये निगेटिव्ह येतील, त्यांनी लगेचच RTPCR टेस्ट करून घ्यायची आहे, असे आयसीएमआरने म्हटले आहे.
घरच्या घरी कोरोना चाचणी करण्यासाठी नवीन किटला आयसीएमआरने हिरवाकंदील दाखविला आहे. पुणे येथील कंपनी Mylab Discovery Solutions Ltd. ने CoviSelfTM (PathoCatch) हे किट बनवले असुन
यासाठी गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल स्टोअरवरून एक अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. यावर तुमचे नाव आणि नंबर टाकून रजिस्टर करावे लागणार आहे. या अॅपची आणि युजर गाईडची लिंक या टेस्ट किटवर दिली जाणार आहे.
त्यावर दिलेल्या प्रक्रियेनुसार कोरोना चाचणी केल्यानंतर त्या किटचा फोटो काढून त्या अॅपवर अपलोड करावा लागणार आहे.
घरच्या कोरोना टेस्ट किटची किंमत २५० रुपये ठेवण्यात आली आहे. या किटद्वारे १५ मिनिटांत रिझल्ट येणार आहे.