सावंतवाडी /-
सेवेकरी कोरोना बाधित आढळून आल्याने सुरेंद्र बांदेकर यांच्या पुढाकारातून करण्यात आले निर्जंतुकीकरण
सावंतवाडी-: शहरातील नरेंद्र डोंगरावरी प्रसिद्ध हनुमान मंदिरात सेवेसाठी असणारा नागरिक कोव्हीड बाधित झाल्यामुळे व येणाऱ्या हनुमान जयंतीच्या उत्सवाच्या दक्षतेसाठी या मंदिराचे सेवेकरी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांनी पुढाकार घेऊन संजू विरनोडकर टीम मार्फत संपूर्ण मंदिर परिसर, महाप्रसादाचे स्वयंपाक गृह, धर्मशाळा, अखंड वाहणारे झरे व जलकुंड व भाविकांना बसण्यासाठी असणारे बाक व संपूर्ण मंदिर परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. या ठिकाणी सुरेंद्र बांदेकर, सेवेकरी रवी बांदेकर व भाविक संजू वीरनोडकर टीमचे संतोष तळवणेकर, तुषार बांदेकर, आकाश मराठे, सागर मळगावकर, रवी बांदेकर या सर्वांनी सहभाग घेऊन मंदिर परिसर स्वच्छ निर्जंतुक करण्यात आला आहे. नगरसेवक सुरेंद्र बांदेकर व भाविकांनी संजु विरनोडकर यांचे यावेळी आभार मानले.