संबंधीत।कर्मचाऱ्याना कारणे दाखवा नोटीस:पोलिसात गुन्हा दाखल करणार..
सिंधुदुर्ग /-
जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ श्रीमंत चव्हाण यांना शासनाने निलंबित केल्यानंतरही त्यांनी आपल्या बंगल्याची आणि गााडीची चावी कार्यालयात जमा केल. नसल्याने जिल्हा रुंग्णालय कार्यालयाची फार मोठी कुचंबणा झाली आहे.महत्वाचे म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्याकडे मंजुरीसाठी काही फाईल्स आणि बिले पाठविण्यात आली होती.त्यापैकी काही फाईल्स आणि बिले त्यांनी मंजुरीशिवाय परत पाठविल्याचे समजते.मात्र अजून काही महत्वाच्या फाईल्स, विशेषतः ‘कोविड ‘ संबंधीच्या फाईल्स बंगल्यावरच असल्याचे सांगण्यात येते.
जिल्हा रुंग्णालय कार्यालयाने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याशी अद्यापही संपर्क होऊ शकलेला नाही.जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून जिल्ह्यात दाखल झाल्यापासून चव्हाण वादग्रस्त बनले होते.काही दिवसांपूर्वी चव्हाण यांना विनयभंग प्रकरणी अटक होऊन जामीन मिळाला होता.४८ तासांपेक्षा अधिक काळ ते कोठडीत राहिल्याने आरोग्य विभागाने त्यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई केली होती.याबाबतचे आदेश त्यांच्या बंगल्यावरील मुख्य प्रवेशदारावर चिकटविण्यात आला आहे.
जिल्हा शल्यचिकित्सकांसाठी असलेली शासकीय ‘आर्टिका ‘ गाडीची चावी त्यांनी अद्यापही जमा केली नसून ही गाडी बंगल्याच्या दारातच उभी आहे.दरम्यान विद्यमान जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी यासंदर्भात कार्यालयीन कारवाईला सुरुवात केली असून त्यांनी गाडीचा चालक आणि बंगल्यावर काम करणारा परिचर या दोघांना यासंदर्भात ‘कारणे दाखवा नोटीस ‘ दिली असून दोघांनी अजूनही नोटीशीला उत्तर दिलेले नाही.
हे दोघेही कंत्राटी कर्मचारी आहेत.चव्हाण हे कुठे गेले हे आपल्याला माहिती नाही आणि बंगल्याची चावी आपल्याकडे दिलेली नाही असे बंगल्यावरील कर्मचाऱ्याने चौकशी दरम्यान तोंडी जबाबात सांगितले.तर चालकास गाडीच्या चावीबद्दल विचारले असता ‘चावी’ बद्दल आपणास काहीही माहिती नसल्याचे चालकाने तोंडी जबाबात सांगितल्याचे समजते.
येत्या एक-दोन याप्रकरणी जिल्हा रुंग्णालय कार्यालयातर्फे ओरोस पोलीस ठाण्यात चव्हाण व अन्य दोघा कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.विद्यमान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील हे गाडी नसल्याने कार्यालयीन कामासाठी स्वतःचे वाहन वापरत आहेत असे सांगण्यात आले.