कणकवली /-
कणकवली-देवगड-वैभवाडी चे भाजपा आमदार नितेश राणे यांची डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या कार्यकारी परिषदेवर प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांनी निवड केली आहे. या निवडीने आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळात केलेल्या कामाचा ठसा उमटला आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जण असलेला अभ्यासू आमदार म्हणून विधानसभेत आमदार नितेश राणे यांनी आजपर्यंत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
अवकाळी पाऊस,वातावरणातील बदल आणि त्यामुळे शेतकरी,आंबा बागायतदार यांचे होणारे नुकसान,या कडे सातत्याने सभागृहाचे लक्ष वेधून घेण्यास आमदार राणे यशस्वी झाले होते.कोकण कृषी विध्यापिठाच्या माध्यमातून कोकणातील शेतकरी, बागायतदार यांच्या जीवनमानात अमूलाग्र बदल घडावा,नवनवीन संशोधन व्हावे,त्यासाठी विधानसभेचे आमदार म्हणून विद्यापिठात प्रतिनिधित्व करावे म्हणून ही निवड अध्यक्षांनी केली आहे.
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ , दापोली या विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांची नियक्ती केली जाते त्यात आम.नितेश राणे हेअभ्यासू आमदार म्हणून निवड केले आहे.त्यांच्या सोबत आम. योगेश कदम , आम.शेखर निकम,यांचीही निवड केली असल्याचे प्रधान सचिव , कृषी विभाग , महाराष्ट्र शासन यांनी कळविले आहे.
कार्यकारी परिषद ही विध्यपीठाचे महत्वाचे निर्णय घेते.कोकण कृषी विद्यापीठाच्या बाबतीत अनेक निर्णय होणे गरजेचे आहे. यामध्ये आंबा काजू या फळांच्या नवीन जाती शोधणे तसेच दुर्लक्षित असलेल्या रानमेव्याचावर प्रक्रिया उद्योग उभारणे याची गरज आहे.
आमदार नितेश राणे गेले काही दिवस आंब्याला इतर ठिकाणी मार्केट मिळेल का याचा शोध घेत आहेत यामुळे आमदार नितेश राणे यांना ही नवीन संधी प्राप्त झाली आहे आमदार नितेश राणे यांचे या नव्या निवडीबद्दल सर्व थरातून अभिनंदन होत आहे.