कुडाळ/-
विनामास्क फिरत असलेला एका नगरपंचायतीच्या वरिष्ठ पदावरील अधीकाऱ्यांलाच नीविनामास्कच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.विनामास्कच्या अनुषंगाने होणार्या कारवाईपासून सुटका करून घेण्यासाठी या वरिष्ठ पदावरील व्यक्तीचे सर्वच प्रयत्न निष्फळ ठरले. कारवाई टाळण्यासाठी प्रयत्न केल्याने पोलिसांनी याला विनामास्क तसेच अनेक विषय एकत्र करत ९०० रु दंड वसूल केला.
सद्यस्थितीत विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलिस व नगरपंचायत प्रशासन जोरदार कारवाई करत शहरात अनेक ठिकठिकाणी कारवाई चालू आहे त्यामुळे याचा सर्वसामान्य नागरिकांनी चांगलाच धसका घेतला आहे. कारवाईत सापडल्यानंतर त्यापासून सुटका करून घेण्यासाठीही अनेकांकडून अनेक प्रयत्न केले जातात. असाच एक प्रकार कुडाळ शहरात मंगळवारी सायंकाळी कुडाळ पोलिस स्टेशन समोर घडला. एका नगरपंचातचा इंजिनीअर पदावरील एक अधिकारी अन्य एकासह आपल्या दुचाकीने कुडाळ पोलिस स्टेशन समोरुन जात होता. तोंडाला मास्क नसल्याने पोलिसांनी त्याला अडवले व दंड भरण्याची विनंती केली. पण त्याने हा दंड भरण्यास टाळाटाळ करत पोलिसांशी एका वेगळ्या प्रकारे संभाषण सुरू केल्याने पोलिसांनी कारवाई केली यावेळी या अधिकाऱ्याने आपल्या सोबत असलेल्या अन्य व्यक्तीला तू दंड भरुन ये मी जातो असे सांगितले यावेळी पोलिसांनी त्याला योग्य शब्दात समज देत ज्याच्यावर कारवाई त्यालाच दंड भरावा लागणार आहे असे सांगत पोलिसांनी दोनशे रुपये विनामास्क चे अन्य ५०० रू व मागिल कारवाईचे पोलिसांच्या आँनलाईन अँपद्वारे आढळलेले व प्रलंबित असलेले २०० रू असा ९०० रू दंड वसूल करूनच त्याला सोडले. यावेळी काही जणांकडून फोनाफोनी ही झाली. विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करणे ही पोलिस व नगरपंचायत प्रशासन ची जबाबदारी असताना एका नगरपंचायत प्रशासनाचे एका अधिकाऱ्याकडून झालेला हा विषय चर्चेचा विषय ठरला.