वैभववाडी/-

वैभववाडी शहरातील माईनकरवाडी येथे भाडोत्री राहणाऱ्या सांगूळवाडी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीचे चार्जिंगकरण्यासाठी लावलेले मोबाईल चोरणाऱ्या चोरटयाला वैभववाडी पोलिसांनी एक वर्षा नंतर कणकवली शहरात पकडले.ही कारवाई शुक्रवारी 23 ऑक्टोबर रोजी वैभववाडी पोलिसांनी केली.

सांगुळवाडी येथे कृषि विद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थिनीने वैभववाडी शहरातील माईनकरवाडी येथील भाड्याच्या खोलीमध्ये राहणाऱ्या चंचल भुते व रुचिरा नार्वेकर यांचे सुमारे 30000 रुपये किमतीचे दोन मोबाईल चार्जिंगला लावले आरोपी संकेत शिवराम पवार वय 21 रा.उंबर्डे कातकरवाडी येथील सराईत चोरस्त्याने ते खोलीच्या मागच्या बाजूने प्रवेश करून दिनांक 3 जून 2019 रोजी दुपारी 3 वा.च्या दरम्यान चोरून नेले होते.आरोपीने दोन्ही मोबाईल नालासोपारा मिरा रोड या ठिकानी नेऊन विकले होते.या घटनेचा तपास वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू जामसंडेकर यांच्याकडे सोपविण्यात आला होता.विकले मोबाईल याब्यात घेतले. मात्र मोबाईल विकणारा आरोपी हा पोलिसांना गेले वर्षभर चकवा देत होता. मात्र वैभववाडी पोलीस त्याचा शोध घेत होते.गुरुवारी वैभववाडी पोलिसांना विश्वसनीय माहिती मिळाली होती त्या नुसार त्याला शुक्रवारी कणकवली शहरातून वैभववाडी पोलीसांनी अटक केली.त्यानंतर त्याला 23 ऑक्टोबर शुक्रवारी वैभववाडी पोलीस स्टेशनला आणले.चोरी प्रकरणी तपास सुरू आहे.शनिवारी आरोपीला कणकवली न्यालयात हजर करण्यात येणार आहे.
ही कारवाई वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू जामसंडे,पो.कॉन्स्टेबल मारुती सोनटक्के, संदीप राठोड ,यांनी केली. अधिक तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page